आपल्या शाळेमध्ये Amazon Future Engineer (AFE) या प्रकल्पाअंतर्गत पाय-जॅम फाउंडेशन यांच्या सयुंक्त विद्यमाने व जिल्हा परिषद पुणे यांच्या सहाय्याने आधुनिक संगणकीय संसाधने (Raspberry Pi Sensor kits) युक्त संगणक लॅब (मॉडेल Pi-lab) स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये एकूण ८ संगणक प्रणालीसोबत Raspberry Pi Sensor kits देखील देण्यात आले आहेत. यासोबतच या शिक्षणप्रणालीबद्दल विद्यार्थ्यांना Computer Science विषयाबद्दल प्रशिक्षण देण्यासाठी पाय-जॅम फाउंडेशन संस्था पुणे यांचेकडून प्रशिक्षक देखील देण्यात आले आहेत जे विद्यार्थ्यांपर्यंत हे प्रशिक्षण पोहचवण्याचे काम करत आहेत. या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये २१ व्या शतकातील कौशल्य विकास आणि आधुनिक शिक्षणाची जोड देखील मिळत आहेत, यामधून विध्यार्थ्यामध्ये सृजनशीलता, समस्या निवारणता, तसेच बौद्धिक विकास आणि वैचारिकता वाढण्यास नक्कीच मदत होईल.
आमच्या शाळेत खेळाच्या मैदाना शेजारी जवळपास १ एकर मोकळी जागा आहे. आमच्या शिक्षकांच्या संकल्पनेतून आम्ही या ठिकाणी सेंद्रिय शेतीचा उपक्रम राबवतो. कार्यानुभव विषयांतर्गत आम्ही शाळेत सेंद्रिय शेतीचे शिक्षण घेतो.
आतापर्यंत आम्ही शेतीमध्ये झेंडू, मेथी, मका, वांगी, टोमाटो, इत्यादी फुले व भाज्यांचे पिक घेतले आहे. सेंद्रिय शेतीसाठी शाळेतील विघटनशील कचऱ्यापासून आम्ही कंपोस्ट खात बनवण्याचा प्रकल्प देखील उभारला आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही शेताला पाणी देतो, शेतीची खुरपणी व इतर कामे करतो. शेतात कीड नियंत्रणासाठी सेंद्रिय औषधाची फवारणी केली जाते.
विध्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी शाळेमध्ये दरवर्षी sanskrutik कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पर्जासात्तक दिनाच्या दिवशी तसेच गावच्या याठेदार्म्यान देखील केले जाते. या कार्यक्रमात विद्यार्थी त्यांच्या विविध कलांचे प्रदर्शन करतात. पालक व गावच्या सहकार्याने या कार्यक्रमांची शोभा आणखीनच वाढते.
शाळेला भव्य मैदान लाभलेले आहे. यामुळे मुलांमधील क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी चालना मिळते. शाळेच्या मैदानावर खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, लांब उडी, गोळाफेक, उंच उडी,थाळीफेक, व इतर अनेक खेळ खेळले जाताज. शाळेकडे या सर्व खेळांचे साहित्य देखील उपलब्ध आहेत. जानेवारी च्या महिन्यात शाळेत क्रीडास्पर्धा होतात. या स्पर्धांसाठी विध्यार्थ्यांना तयारी साठी त्याआधी मुबलक वेळ देखील दिला जातो. शाळेने गेल्या ७ वर्षात "यशवंतराव चव्हाण कला क्रीडा मोहत्सावत २५० पेक्षा जास्त बक्षीसे" मिळवलेली आहेत.