पवित्रं प्रसन्नं गुणोत्कर्षकारम् ।
इदं मन्दिरं स्यात् वयःशक्तिस्थानम् ॥
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थोरांदळेची स्थापना १९४५ साली तत्कालीन जिल्हा परिषद पुणेच्या वतीने करण्यात आली. काही काळ पहिली ते सातवी चे वर्ग असणारी शाळा, आता मात्र इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग असणारी तालुक्यातील एकमेव शाळा आहे.
क्रीडा क्षेत्रामध्ये सातत्याने केंद्र व जिल्हा स्तरापर्यंत उत्कृष्ट कामगिरी शाळेतील विद्यार्थ्यांनी 'यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सवामध्ये केली आहे.
शाळेमध्ये परसबाग, शेती उपक्रम प्रभावीपणे राबविले जातात.
२०१५ - १६ शैक्षणिक वर्षामध्ये शाळेला मानाचा "पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष चषक" मिळाला आहे.
सन २०२० - २१ मध्ये शाळेचा महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या आदर्श - शाळांमध्ये समावेश केला गेला आहे.
इ. ८ वी NMMS व शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये शाळेने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी किली आहे त्यामुळेच शाळेमध्ये मंचर, चांडोली, रांजणी परिसरातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मंचरमधून मुले स्कूल बसने शाळेत येतात
इयत्ता | १ ली | २ री | ३ री | ४ थी | 5 वी | ६ वी | ७ वी | ८ वी | एकूण |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
मुले | 13 | 12 | 12 | 13 | 11 | 11 | 16 | 10 | 102 |
मुली | 08 | 08 | 10 | 15 | 20 | 14 | 20 | 10 | 101 |
एकूण | 21 | 20 | 22 | 26 | 31 | 25 | 36 | 20 | 203 |